हाथरस घटनेच्या निषेधार्थ अकोलेत निषेध मोर्चा
हाथरस घटनेच्या निषेधार्थ अकोलेत निषेध मोर्चा
नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची घटना आणि पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेण्यास जाणार्या काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अटकाव करून अटक केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने नुकताच आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.

हाथरस घटनेतील तरुणीला न्याय मिळावा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे व नवीन शेती विधयके लागू करू नयेत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, किसान सभेचे प्रदेश सचिव डॉ.अजित नवले, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत, राजेंद्र कुमकर, सोन्याबापू वाकचौरे, अॅड.शांताराम वाळुंज, अॅड.किसन हांडे, भाऊसाहेब नवले, अरुण रूपवते, सुरेश खांडगे, चंद्रभान नवले, जालिंदर बोडके, संदीप शेणकर, आरिफ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, सचिन पवार, मारुती मेंगाळ आदी उपस्थित होते.

