हाथरस घटनेचा नेवाशातील मुस्लीम बांधवांकडून निषेध
हाथरस घटनेचा नेवाशातील मुस्लीम बांधवांकडून निषेध
नायक वृत्तसेवा, नेवासा
उत्तर प्रदेशातील हाथरस चांडप्पा येथील युवतीवर काही नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कार घटनेचा नेवासा येथील मुस्लीम समाज बांधवांनी जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेतील नराधम आरोपींना कठोर शासन करण्यात यावे आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
![]()
सदर निवेदनात म्हटले आहे की, नराधमांनी दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची जीभ कापण्यात आली. तर पाठीचा कणा मोडून तिला जखमी करण्यात आले. या अमानवी घटनेचा आम्ही सर्व मुस्लीम समाज निषेध करत असून ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे सर्वसाधारण जनतेत असंतोष पसरला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या इच्छेविरुद्ध तेथील पोलीस प्रशासनाने पीडित मुलीच्या कुटुंबास घरात बंद करून मुलीचा अंतिम संस्कार केला. ही लोकशाही आहे की ठोकशाही असा सवाल करत या घटनेने देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या अमानवी घटनेतील गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही नेवासा येथील मुस्लीम समाजाने निवेदनात केली आहे. या निवेदनावर ज्येष्ठ समाजसेवक गफूर बागवान, असीफ पठाण, शोएब पठाण, अॅड.जावेद इनामदार, जुम्माखान पठाण, बाबरखान पठाण, मुक्तार शेख, हारुण जहागिरदार, नगरसेवक अल्ताफ पठाण, फरदीन पठाण, शरीफ पटेल, अॅड.अय्याजखान पठाण, समीर सय्यद, सुलेमान मणियार, महंमद शेख, जावेद शेख, जंगबहादूर पठाण, बिलाल अत्तार, आलम पिंजारी, सोनू जहागिरदार, इरफान शेख, शादाब तांबोळी, कलीम सय्यद यांच्या सह्या आहेत.

