शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी ः ओहोळ थोरात कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वावर कारखान्याची वाटचाल सुरु आहे. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारासह तालुक्यात सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरु आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. ऊस हे शास्वत पीक असल्याने शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.
संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2022 – 2023 या गळीत हंगाम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचन थोरात, दुर्गा तांबे, लक्ष्मण कुटे, इंद्रजीत थोरात, संतोष हासे, आरती थोरात, अमित पंडित, गणपत सांगळे, माधव हासे, अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, सुभाष सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी आरती यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषा, रमेश गुंजाळ व त्यांच्या सुविद्य पत्नी ममता गुंजाळ, इंद्रजीत खेमनर व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली खेमनर, विनोद हासे व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली हासे, अनिल काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता काळे यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग, गणपत सांगळे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, मीनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, संभाजी वाकचौरे, माणिक यादव, मंदा वाघ, शिवाजी जगताप, नानासाहेब दिघे, नानासाहेब गुंजाळ, शांताराम कढणे, दत्तू खुळे, किरण कानवडे, ब्रम्हदेव यादव, एन. बी. गडाख, ए. के. मुटकुळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.