संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या 33 व्या शतकाच्या उंबरठ्यावर ! शहरातील तेरा जणांसह आजही शेहचाळीस रुग्णांची नव्याने पडली भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज अर्धशतकाच्या आसपास भर पडण्याची परंपरा अव्याहतपणे सुरुच आहे. रोज शासकीय व खासगी प्रयोगशाळेकडून जेमतेम व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे त्याहून दुप्पट अथवा तिप्पट रुग्ण सापडत आहेत. आजही अशाच पद्धतीने रुग्ण समोर आले आहेत. आजही खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून 14 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून तेहतीस जणांसह शेहचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात शहरातील तेरा जणांसह ग्रामीणभागातील बत्तीस जणांचा समावेश आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडल्याने बाधितांची एकूण संख्या 33 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 3 हजार 297 वर जावून पोहोचली आहे.

1 सप्टेंबरपासून तालुक्याच्या रुग्णवाढीला गती प्राप्त झाली. एकीकडे शहरीभागातील दररोजच्या रुग्णसंख्येला ओहोटी लागली तर दुसरीकडे ग्रामीणरुग्णसंख्येला अचानक भरती प्राप्त होवून तालुक्याच्या विविध भागातून रुग्णसमोर येवू लागले. त्यामुळे गेल्या महिना-दिड महिन्यापर्यंत शहरासह तालुक्यातील अवघ्या काही गावांमध्ये असलेले संक्रमण आज तब्बल 170 पैकी 141 गावांपर्यंत जावून पोहोचले आहे. अर्थात खेड्यांमध्ये संक्रमण वाढल्याचे दिसत असले तरीही त्यातून संपूर्ण गावाला कोविडचा विळखा पडलेला नसून काही घरांमध्येच हा संसर्ग फोफावला आहे.

आज खासगी प्रयोगशाळेकडून 14 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यातून शहरातील 13 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील पावबाकी रस्ता परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 व 20 वर्षीय महिला तसेच अवघ्या चार महिन्याच्या बालिकेलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबतच साईनगर परिसरातील 50 व 24 वर्षीय महिला, गणेशनगर परिसरातील 43 वर्षीय महिलेसह 13 व 7 वर्षीय बालिका, वीज मंडळाच्या वसाहतीमधील 32 वर्षीय तरुण, मालदाडरोड वरील 47 वर्षीय इसम, देवगाव रस्त्यावरील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व घोडेकर मळ्यातील 42 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

त्यासोबतच ग्रामीण भागातील केळेवाडी येथील 52 वर्षीय इसम, डोळासणे येथील 55 वर्षीय इसम, जवळे बाळेश्वर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 13 व 7 वर्षीय बालिका, चिकणी येथील 50 वर्षीय इसम, सायखिंडीतील 55 व 26 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 41 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथील 50 वर्षीय इसम, मंगळापुर येथील अकरा वर्षीय बालिका, आश्वी बुद्रुक येथील 52 वर्षीय इसम, शेंडेवाडी येथील 65 वर्षीय महिला, वडगाव पान मधील 43 वर्षीय तरुणासह 13 वर्षीय बालक, गुंजाळवाडीतील 74, 65 व 52 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तसेच 31 वर्षीय तरुण व 37 वर्षीय महिला,

समनापुर येथील 55 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, मालदाड येथील 52 व 35 वर्षीय महिला, रायते येथील 34 व 24 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, मांडवे बुद्रुक येथील 35 वर्षीय तरुण, अकलापुर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वडगाव लांडगा येथील 50 वर्षीय इसम, कुरणमधील 46 वर्षीय इसम व शिबलापुर मधील 67 वर्षीय महिला संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत 46 रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्यातील बाधितांची संख्या 33 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 3 हजार 297 वर जाऊन पोहोचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८९.०५ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ४०५ बाधितांची वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ४ हजार १४२ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ०५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि रॅपिड अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०७ रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ७१, अकोले ०३, जामखेड ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १३, नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १४, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीत आज जिल्ह्यातील १९३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासा २४, पाथर्डी २४, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज जिल्ह्यातील ७२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६०, अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४२, नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहाता ६८, राहुरी ४३, संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, लष्करी परिसरातील ०२, लष्करी रुग्णालयातील ०३ व इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ३९ हजार ५६२..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : ४ हजार १४२..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ७२४..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या : ४४ हजार ४२८..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८९.०५ टक्के..
- आज जिल्ह्यातील ७२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ४०५ बाधितांची नव्याने भर पडली..

