राज्यस्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चॅम्पियन! आठ स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; महिनाअखेर पंजाबमध्ये रंगणार सामने


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलच्या क्रीडा संकुलात पार पडलेल्या आठव्या राज्यस्तरीय फ्लोरबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी मोठे यश मिळवले आहे. या स्पर्धेत खेळताना ध्रुवच्या 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले आहे. त्यासोबतच या स्पर्धेतून ध्रुव ग्लोबलच्या आठ खेळाडूंची महिन्याच्या अखेरीस जालंदर (पंजाब) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन करतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 19 वर्षांखालील संघातील ओम घुले, प्रेम बाफना, कृष्णा लामधाडे, मित भंडारी, लक्ष्मीनारायण बाहेती, वेदांत सोमाणी, दीपक नलगे, संकर्ण राहाणे, रुद्र व्यास, सूरज कोकाटे, सार्थक छाजेड, अरहम सोनीमिंडे, रक्षीत खुशलानी, रौनक बुद्धीवंत व साईप्रसाद साठे यांनी प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज देत अजिंक्यपद पटकाविले. तर याच वयोगटातील मुलींच्या संघातील खुशी संचेती, संस्कृती चोरडिया, नित्या सराफ, जान्हवी अग्रवाल, आरुषी मदान, इशिता बियाणी, आंचल चिंतामणी व सर्वदा बाणखेले यांनी प्रतिस्पर्धी संघाशी चिवटपणे संघर्ष केला, मात्र त्यांना चौथ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम खेळाचे प्रदर्शन करणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या मित भंडारी, ओम घुले, वेदांत सोमाणी, प्रेम बाफना, कृष्णा लामधाडे, लक्ष्मीनारायण बाहेती, खुशी संचेती व नित्या सराफ या आठ जणांची याच महिन्याच्या 22 ते 24 सप्टेंबररोजी पंजाबमधील जालंदर येथे होणार्‍या राष्ट्रीय फ्लोरबॉल स्पर्धेसाठीही निवड करण्यात आहे. ध्रुव ग्लोबलच्या फ्लोरबॉल खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक नीलेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 202 Today: 2 Total: 2163644

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *