संस्कार, संस्कृती आणि सकारात्मकेतून विलक्षण ऊर्जा मिळते ः डॉ.बडदे

संस्कार, संस्कृती आणि सकारात्मकेतून विलक्षण ऊर्जा मिळते ः डॉ.बडदे
सूर्यतेजकडून आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
प्रत्येकाच्या जीवनात संस्कार, संस्कृती आणि सकारात्मकेतून विलक्षण ऊर्जा मिळत असते. साधी आणि आनंदी जीवनशैली यातून मनुष्य उत्तम मार्गक्रमण करत असतो. अशा विविधतेने नटलेल्या भारतीय परंपरेचे कार्य सूर्यतेजच्या माध्यमातून होत आहे. यापुढेही छोटे-मोठे महिलांना प्रोस्ताहनपर विविध उपक्रम आयोजित करुन त्यांच्या गुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे व त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड) यांनी केले आहे.


कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेने आयोजित केलेल्या कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत परंपरागत दीपावली-पाडवानिमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धा 2018-2019चे प्रातिनिधिक बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे (आव्हाड), लघू-पशु चिकित्सा अधिकारी डॉ.श्रध्दा काटे, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, वकील संघाच्या माजी उपाध्यक्षा अ‍ॅड.स्मिता जोशी, प्रगतिशील शेतकरी शेखर देशमुख, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.


सूर्यतेज संस्थेद्वारे 20 वर्षांपासून शैक्षणिक, कला-सांस्कृतिक, सामाजिक असे विविध व वैशिष्ट्यपूर्ण समाजोपयोगी कार्य निरंतरपणे सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून बक्षीस विजेत्यांना पैठणीसोबत भेटवस्तू ऐवजी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य कॉथ व गुडूची या संसर्गजन्य आजाराची प्रतिकारक्षमता वाढविणारी औषधे भेट देण्यात आली. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कोमल खर्डे (पारंपारिक), दीपू पंजाबी (व्यंगचित्र), निशा आहेर (पारंपरिक), नेहा वहाडणे (निसर्गचित्र), यश तासकर (व्यक्तीचित्र), रेखा कुमावत (सामाजिक विषय), आदिती नाईक (व्यंगचित्र) यांना प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. रांगोळीकार शीतल लोंढे, दीपाली डहारे यांचा सन्मान करण्यात आला. तर उर्वरित विजेत्यांना संस्थेचे सदस्य व नोंदणी केंद्रावरुन वितरण केले आहे. सूत्रसंचालन कलाशिक्षिका माधवी पेटकर यांनी केले. स्वागत सूर्यतेजचे प्रा.अतुल कोताडे यांनी केले तर आभार मिलिंद जोशी यांनी मानले.

Visits: 20 Today: 1 Total: 114882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *