खुडसरगावमध्ये दोन एकर ऊस आगीत खाक
खुडसरगावमध्ये दोन एकर ऊस आगीत खाक
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यात खुडसरगाव येथे एका शेतकर्याचा दोन एकर ऊस नुकताच आग लागून जळाला आहे. बाळासाहेब पवार असे या शेतकर्याचे नाव असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रथमदर्शनी समजते.
या आगीमध्ये शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण परिसरात मेनलाईन असलेल्या तारा शेतात लोंबकळतात. अनेक ठिकाणी लोंबकळणार्या तारा तशाच असून महावितरणच्या कर्मचार्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी पवार यांनी केली आहे.
Visits: 39 Today: 1 Total: 436914