मुळानगर परिसरातील रहिवाशांची पाण्यासाठी पायपीट

मुळानगर परिसरातील रहिवाशांची पाण्यासाठी पायपीट
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील मुळानगर येथील पाण्याचा पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून खंडीत झाल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी स्थानिक रहिवाशांची पायपीट सुरू झाली आहे.


मुळा पाटबंधारे प्रशासनाच्या दुर्लक्षाने दुर्लक्षाने रहिवाशांवर ही वेळ आली आहे. सुमारे26 टीएमसीच्या मुळा धरणाचा पाणीसाठा शनिवारी 75 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, धरणालगतच्या मुळानगर येथील रहिवाशांची अवस्था ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे. मुळानगर व वरवंडी संयुक्त ग्रामपंचायत अंतर्गत मुळानगर परिसर येत असताना या भागातील ग्रामस्थांच्या मतावर निवडून येणारे सदस्य व पदाधिकायांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने पंचायतीचा सावळागोंधळही चव्हाट्यावर आला आहे. वसाहतीतील मूळ कर्मचार्‍यांचे वास्तव्य कमी असल्याने रिकाम्या खोल्यांत मोलमजुरीनिमित्त आलेल्या नागरिकांचे येथे वास्तव्य आहे. परंतु दहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने पाण्यासाठी वणवण फिरण्याची दुर्देवी वेळ आली आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *