खांडगाव येथील अंगणवाडीच्या कामास नागरिकांचा विरोध गटविकास अधिकार्‍यांना महिलांसह नागरिकांनी दिले निवेदन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील खांडगाव येथील अरगडे व बालोडे वस्तीवरील अंगणवाडीच्या जुन्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु, हा निधी परस्पर दुसर्‍या जागेवर बांधकाम करण्यासाठी वळविण्यात आला. यास स्थानिक महिला व नागरिकांनी तीव्र विरोध करुन आहे त्याच जागेवर काम करावे, अशा मागणीचे निवेदन नुकतेच गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना दिले आहे.

सदर अंगणवाडीचे दुसर्‍या ठिकाणी होत असलेले बांधकाम नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे काम बंद पाडण्यात आले. याबाबत प्रशासनाला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर मिळाले म्हणून गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची जाऊन भेट घेऊन अंगणवाडीचे काम हे आहे त्याच जागेवर करावे अशी ठाम भूमिका मांडली. तसेच सदर काम बंद करावे, अशी मागणी केली.


दरम्यान, जोपर्यंत पुढील काही निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित बांधकाम बंद करावे, अशीही मागणी केली. अरगडे व बालोडे वस्तीवरील अंगणवाडीची देखभाल करण्यास स्थानिक नागरिक करण्यास तयार आहे. त्यामुळे आपण या संदर्भात स्पष्ट आदेश करावेत, असेही निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदन देताना भागवत अरगडे, सुनील बालोडे, नामदेव बालोडे, शंकर अरगडे, रोहिणी अरगडे, कमल अरगडे आदी महिला उपस्थित होत्या.

Visits: 11 Today: 1 Total: 116500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *