चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्सचा ‘ठुशी महोत्सव’! पारंपारिकतेला नाविन्याची जोड देणार्‍या ठुशीचे असंख्य नमुने सादर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सन 1827 पासून सतत नाविन्याचा शोध घेत आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण दागिन्यांचे असंख्य प्रकार सादर करणारे नाव म्हणजे चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. याच परंपरेतून आता पारंपारिकतेला नाविन्याची जोड देत ट्रेंडी डिझाईन्सचा सुरेख संगम असणार्‍या ठुशी महोत्सवात प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाटणार्‍या डिझायनर ठुशींचे विविध प्रकार सादर केले आहेत.

ठुशी हा तसा एक पारंपारिक दागिना. पण काळाच्या ओघात लुप्त होणारी आपली परंपरा चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स यांनी केवळ जपलेलीच नाही तर तिला आजच्या काळातला ‘मॉडर्न लूक’ही दिलेला आहे. याच पारंपारिक व ट्रेंडी ठुशींची असंख्य डिझाईन्स तुमच्यासाठी आयोजित करण्यात आली आहेत. चंदुकाक सराफच्या ठुशी महोत्सवाच्या आयोजनातून प्रत्येक 15 दिवसांनी एक्सक्लुझिव्ह डिझाईन या तत्वाचं पालन कसोशीनं करणार्‍या चंदुकाका सराफ यांच्या या महोत्सवात तुम्हांला तुमच्या आवडीची ठुशी मिळणार हे नक्की ! सोनं व फॉर्मिंग अशा दोन प्रकारांमध्ये चंदुकाका सराफ यांनी ठुशीची नाविन्यपूर्ण श्रेणी महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांना पारंपारिक ठुशीची हौस आहे ती या महोत्सवात पूर्ण होणार आहे तर आजच्या आधुनिक काळातील महिला व युवतींना आवडतील अशा डिझाइनर ठुशीही इथे उपलब्ध आहेत.

पारंपारिक साडी किंवा ड्रेसवर परिधान करता येतील अशी या ठुशीची डिझाईन्स आहेत. या ठुशीसोबतच मॅचिंग कानातले, बांगड्या, मोहनमाळ आणि नथ असा संपूर्ण ‘ठुशी सेट’ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ठुशी महोत्सवासाठी चंदुकाका सराफ तर्फे खास ऑफरही देण्यात आली आहे. या महोत्सवातील 2 दागिने खरेदी करणार्‍या ग्राहकांना घडणावळीवर 5 टक्के सवलत तर 3 दागिने खरेदी करणार्‍यांना 15 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच फॉर्मिंग ठुशीसाठी 599 ते 799 च्या खरेदीवर 5 टक्के सूट तर 799 व वरील खरेदीवर 10 टक्के सूट आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवरून खरेदी करणार्‍यांना अतिरिक्त 5 टक्के सवलतही लागू आहे. उत्सवाच्या या काळात सजण्यासाठी तुम्ही चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. यांच्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील आपल्या नजिकच्या शोरूमला भेट देऊन ठुशी महोत्सवात खरेदीचा आनंद घ्या असे आवाहन चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 242 Today: 1 Total: 1873837

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *