दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा ः आ. डॉ. तांबे संगमनेर येथे दिव्यांगांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिव्यांग व्यक्ती ह्या विशेष व्यक्ती असून त्यांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. या व्यक्तींसाठी काम करणार्‍या शाळा व शाळेच्या शिक्षकांचेही प्रश्न असून त्याबाबत सरकारने सकारात्मक पाऊल उचलून हे प्रश्न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करून प्राधान्याने प्रश्न सोडविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे डॉ. देवेंद्र ओहारा मतिमंद विद्यालय, संग्राम मूकबधिर विद्यालय व दिव्यांग शाळा शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, नाशिक विभागीय प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, दिनकर नाटे, रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब झावरे, संजय साळवे, चांगदेव खेमनर, नारायण डुकरे, मुख्याध्यापक वाय. डी. देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांवर एकदिवसीय कार्यशाळेमध्ये विविध क्षेत्रांबाबत चर्चा झाली
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती या विशेष व्यक्ती आहेत. या व्यक्तींसाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन विशेष उपक्रम राबविले आहेत.शाळा व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने पाठपुरावा करत असून या शिक्षकांना सामाजिक न्याय विभागाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून एक कृती आराखडा बनवून प्रश्न सोडवावेत. तसेच या विभागात आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार द्यावा, असेही ते म्हणाले.

सुप्रिया चव्हाण, सुनील सहस्रबुद्धे, श्रृती आवळे, डॉ. वैशाली कोल्हे यांनीही मार्गदर्शन केले. भगवान तलवारे, बाबासाहेब महापुरे, सचिन तरवडे आदी उपस्थित होते. स्वागत नामदेव गुंजाळ यांनी केले. तर प्रास्ताविक सूर्यकांत शिंदे यांनी करुन आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय साळवे, चांगदेव खेमनर, नारायण डुकरे, वाय. डी. देशमुख, महेंद्र वाघमोडे, बाळासाहेब भुजबळ, आनंद आले, संजय मासाळ, सुनील कवडे, समीर शिंदे, विकास भालेराव, राजू गोरे, शरद कोल्हे, प्रवीण थोरात, सुनीता तळेकर, रावसाहेब पगारे, सुदाम राऊत आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 4 Today: 2 Total: 30533

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *