सैन्यातील नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच आजीने सोडले प्राण! राक्षी येथील जवान सचिन साळवे यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू

नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील राक्षी इथे जवान सचिन रामकिसन साळवे (वय 33) यांचा आसाममधील गुवाहाटी इथे कर्तव्यावर असताना बुधवारी मृत्यू झाला. याची माहिती गावाकडे कळविण्यात आली. या धक्क्याने त्यांची आजी (आईची आई) गंगूबाई सुखदेव जगधने (वय 70) यांचे निधन झाले. आजीवर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन यांचे बंधू प्रवीण हेही लष्करात आहेत. त्यांनाही या घटनेचा त्रास झाल्याने रुग्णालयात न्यावे लागले. राक्षी येथील सचिन आणि प्रवीण हे दोघेही भाऊ 2011 पासून लष्करी सेवेत आहेत. सचिन गुवाहाटी येथे कार्यरत होते. तर प्रवीण जम्मू-काश्मीरमधील नवसारा येथे कार्यरत आहेत. प्रवीण सध्या सुट्टीवर गावी आलेले आहेत. बुधवारी लष्कराकडून गुवाहाटी येथे कार्यरत सचिन यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली. मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

सचिन यांचे प्राथमिक शिक्षण राक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे घेतल्यानंतर ते लष्करात 2011 ला भरती झाले. त्यांचे बंधू प्रवीण हेही त्याच दरम्यान भरती झाले आहेत. ते सध्या जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. सचिन यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर आजी गंगूबाई सुखदेव जगधने यांना धक्का बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यार गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिन यांचे बंधू प्रवीण सध्या सुट्टीवर गावी आलेले आहेत. सुट्टी संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच भावाच्या मृत्यूची बातमी समजली. त्यामुळे त्यांनाही याचा धक्का सहन झाला नाही. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्यात आले. गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. सचिन यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Visits: 107 Today: 1 Total: 1098305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *