आंतरशालेय नृत्य स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलकडून पदकांची लयलुट! 36 विद्यार्थ्यांनी पटकाविली 68 पदकं; आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही झाली सर्वांची निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवा येथील मडगावच्या रवींद्र भवन सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रीय आंतरशालेय व महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने पदकांची अक्षरशः लयलुट केली. देशभरातील विविध राज्यातून आलेल्या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्‍या ध्रुवच्या 36 स्पर्धकांनी शास्त्रीय व लोकनृत्य प्रकारांमध्ये तब्बल 68 पदकांची कमाई केली. कल्चरल फऊंडेशन ऑफ इंडिया आणि गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाने या स्पर्धांचे आयोजन केले होते.

राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, ओडिशा अशा विविध राज्यांचे नृत्यसंघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या वृष्टी धीरज पटेलने शास्त्रीय नृत्य प्रकारात दुसरा क्रमांक मिळवला. इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या शास्त्रीय व लोकनृत्य प्रकारात सोहम नेमिनाथ चौधरी, श्रेया महेश मयूर, रितिका सौरभ शाह, ओवी बाळासाहेब ठोंबरे, आद्या गिरीश डागा, आरोही सचिन आवारी, अजुनीकौर बलज्योतसिंग पंजाबी, दर्शी पंकज पटेल, अर्णवी हृषीकेश शहाणे, आराध्या जनार्दन पुजारी, मधुरा राजू कानवडे, मनस्वी मारुती भांडकोळी, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी, स्वरा सतीश वलवे, कस्तुरी रवींद्र पानसरे व वैष्णवी सचिन महाले यांनी दुसरा क्रमांक पटकावित रौप्य पदकांची कमाई केली.

इयत्ता आठवी ते बारावीच्या गटात ध्रुव ग्लोबलच्या नृत्य स्पर्धकांनी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवतांना या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. या संघात ईश्वरी गोकुळ खताळ, अनुष्का रुपेश मेंद्रे, वेदिका सतीश वर्पे, अनुष्का गणेश शिंदे, आदिती सुनील डेरे, श्रद्धा प्रशांत दिवेकर, याशिका अनिल सैनी, तन्वी दीपक आहेर, माही अरविंद सोमा, तनुजा काशिराम पागडे, सिद्धी संजय फरगडे, साची रमाकांत राठी, सौम्या सचिन जोशी, रीत चेतन राजपाल, श्रिया अमोल मुळे, पृथा हृषीकेश मोंढे, जिया अमित बाफना व वृष्टी धीरज पटेल यांचा समावेश होता.

ध्रुव ग्लोबल स्कूलचे नृत्य प्रशिक्षक सोनाली महापात्रा व गंधर्व पलाई यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. सगुण वेलीप, कालिदास घटवाल, अजय गौडे व एंजेलो फर्नांडीस यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्यावतीने सहभागी झालेल्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सर्व 36 विद्यार्थ्यांची आगामी आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 1775822

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *