कोंढवडमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त विविध कार्यक्रम ग्रामपंचायत व अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण तर लहान मुलांना खाऊचे वाटप


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील कोंढवड येथे ‘आजादी का अमृत महोत्सव’निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आजादी का अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत महिलांना ग्रामपंचायत कार्यालयातून राष्ट्रध्वज देऊन या देशव्यापी आभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामसेवक शिवाजी पल्हारे यांनी राष्ट्रध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. ग्रामपंचायत व अंगणवाडी परिसरात ग्रामसंघाच्या सामाजिक मूल्यमापन समितीच्या कमल म्हसे, मंगल म्हसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धनासाठी महिलांना विविध प्रकारचे वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील लहान मुलांना शंकर औटी यांनी खाऊ दिला.

या कार्यक्रमास कोंढवड सोसायटीचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ म्हसे, मधुकर रामदास म्हसे, बंडू म्हसे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे, बाबासाहेब माळवदे, देवीदास म्हसे, बबन सातपुते, सीआरपी राधिका म्हसे, कृषीसखी सुप्रिया म्हसे, राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली म्हसे, सरीता म्हसे, शोभा म्हसे, नंदिनी म्हसे, प्रतिभा औटी, मीना म्हसे, उषा पवार, मेघना म्हसे, छाया शेजवळ आदिंसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *