घारगाव पोलिसांनी चार गोवंश जनावरांची केली सुटका
घारगाव पोलिसांनी चार गोवंश जनावरांची केली सुटका
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी शिवारातील 19 मैल येथे कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणार्या वाहनाला मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांनी पकडले. या प्रकरणी पिकअपसह चार गोवंश जनावरांना ताब्यात घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील मदिनानगर येथील शमशुद्दीन नसीर कुरेशी आणि कमल पेट्रोल पंपाजवळील फिरोज सकबुल पठाण हे दोघे पिकअपमधून (क्र.एमएच.17, टी.8735) 40 हजार रुपये किंमतीच्या दोन मोठ्या गायी आणि 8 हजार रुपये किंमतीच्या दोन कालवड अशा चार गोवंश जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात होते. पोलिसांना माहिती मिळताच 3 लाख रुपये किंमतीच्या वाहनासह गोवंश जनावरांना ताब्यात घेऊन वरील दोघा आरोपींविरोधात पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन 358/2020 भादंवि कलम 34, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 अ, 5 ब, 9, 11 अ, 9 अ, ड, इ नुसान गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. ए. लांघे हे करत आहे.

