श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे रक्षाबंधन व श्रावणमास महोत्सव सुरू हर हर महादेवचा जयघोष करत महोत्सवाचा धर्मध्वजारोहणाने शुभारंभ
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील हंडीनिमगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे अजानबाहू योगीराज प्रल्हादगिरी महाराज यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्ताने रक्षाबंधन व श्रावण मास महोत्सव सुरू करण्यात आला आहे. सोमवार (ता.8) ते गुरुवार (11 ऑगस्ट) या कालावधीत होणार्या श्रावण महोत्सवाचा शुभारंभ हर हर महादेवचा जयघोष करत महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने करण्यात आला.
याप्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे प्रमुख महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात धर्मध्वजपूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य प्रकाश मुळे व जोशी गुरू यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील नाथबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक अशोक शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकाचे सादरीकरण केले.
या महोत्सवात सकाळी 6 ते 7 महाआरती, सकाळी 9 ते 11 शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, सायंकाळी 6 ते 7 महाआरती व हरिपाठ, रात्री 7 ते 9 कीर्तन कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने सुरू झालेल्या शिवलीलामृत ग्रंथाचे व्यासपीठ प्रमुख म्हणून भिसे बाबा व काळे महाराज हे भूषवत आहे. सोमवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांनी स्वागत केले. तर उस्थळदुमाला येथील भजनी मंडळाने मंदिर प्रांगणात भजनाचा कार्यक्रम सादर केला. गुरुवारी योगीराज प्रल्हादगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार असून यादिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, फराळ वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी अमृतानंद महाराज कांकरिया, बदाम महाराज पठाडे, हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, माजी सरपंच भिवाजी आघाव, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, विठ्ठल पाषाण, कल्याणराव उभेदळ, भाकचंद पाडळे, मनोहर जाधव, डॉ. रेवणनाथ पवार, ग्रामसेवक धनाजीराव फरताडे, अनिल पिसाळ, भाऊसाहेब येवले, अर्जुन जाधव, रमेश महांकाळ, गोरख गुंजाळ, अॅड. कल्याण पिसाळ, वीरेंद्र पवार, कचरू पठाडे आदिंसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांना दिवसभर शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले.