राज्यस्तरावरील पुरस्काराला पवळा हिवरगावकरांचे नाव संगमनेर तालुक्याची भूमिकन्या; राज्य सरकारकडून घोषणा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध क्षेत्रांत काम करणार्‍या कलावंतांना राज्य सरकारतर्फे पुरस्कार देण्यात येतात. यातील तमाशा क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या कलाकाराला देण्यात येणार्‍या सांस्कृतिक पुरस्काराला संगमनेर तालुक्याची भूमिकन्या, आद्य तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. 19 व्या शतकात 1885 मध्ये तमाशाच्या रंगमंचावर खरेखुरे स्त्री-पात्र साकारणार्‍या पवळाबाईंचा यामुळे सन्मान होणार असला, तरी त्यांच्या मूळगावी मात्र त्यांचे स्मारक नाही. परिणामी, नाही चिरा नाही पणती अशी अवस्था झाली आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिले जाणारे सांस्कृतिक पुरस्कार व वृद्ध साहित्यिक व कलाकारांना देण्यात येणार्‍या मानधन योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यस्तरावर विविध कलांमध्ये बहुमूल्य योगदान देणार्‍या कलाकारांचा यथोचित गौरव व्हावा म्हणून हे पुरस्कार महामहीम व्यक्तींच्या नावे दिले जातात. तमाशा लोककला पुरस्कारास वृद्ध सांस्कृतिक व कलावंत मानधन योजनेला पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर असे नाव दिले आहे.

Visits: 110 Today: 1 Total: 1101684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *