सर्वोदय पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील सहकारात अग्रगण्य सर्वोदय नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अपवाद वगळता आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

यामध्ये सचिन शाह, सुभाषचंद्र शाह, कल्पेश मेहता, वैभव शाह, आशिष शाह, संकेत शाह, विनीत मेहता, श्रीपाल ओहरा, पंकज बजानिया, नितेश शाह, प्रसाद कटारिया, भरतकुमार दिवाणी यांची सर्वसाधारण गटात निवड झाली आहे. तर गौरी शाह व क्षमा शाह यांची महिला प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. तसेच अरुण नारायणे यांची अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून, राजेंद्र काळे यांची मागासवर्ग प्रतिनिधी आणि नितीन भागवत यांची भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. वाकचौरे यांनी काम पाहिले. सहाय्यक म्हणून संस्थेचे व्यवस्थापक मधुकर वनम यांनी काम पाहिले. संचालकांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Visits: 96 Today: 2 Total: 1113277

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *