राष्ट्रीय शिक्षक संचेतनाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.डॉ.शेणकर
राष्ट्रीय शिक्षक संचेतनाच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.डॉ.शेणकर
नायक वृत्तसेवा, अकोले
राष्ट्रीय शिक्षक संचेतना या मध्यप्रदेशस्थित राष्ट्रीय स्तरावर शिक्षण, साहित्य, संस्कृती व समाजोपयोगी उपक्रमांत अगे्रसर असणार्या संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा.डॉ.भरत शेणकर यांची निवड झाली आहे.

प्रा.डॉ.शेणकर हे राजूर येथील अॅड.मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालय येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून गत 25 वर्षांपासून कार्यरत आहे. या बैठकीत राष्ट्रीय मुख्य कार्यकारी अध्यक्षा म्हणून सुवर्णा जाधव (मुंबई), राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दक्षिण भारतपदी डॉ.शहाबुद्दीन शेख (पुणे), राष्ट्रीय उपमहासचिवपदी रागिनी शर्मा (इंदौर), राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून सुंदरलाल जोश (नागदा), राष्ट्रीय उपमहासचिवपदी लता जोशी (मुंबई), दिल्ली एनसीआरपदी राकेश छोकर, उत्तर भारत राज्यांच्या प्रभारीपदी निक्की शर्मा (मुंबई), छत्तीसगड प्रदेशाध्यक्षपदी आभा श्रीवास्तव (रायपूर), राष्ट्रीय सचिवपदी डॉ.आशिष नायक (रायपूर) तर डॉ.ममता झा (मुंबई) यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ब्रजकिशोर शर्मा, संरक्षक डॉ.शैलेंद्रकुमार शर्मा, हरेराम वाजपेयी, महासचिव डॉ.प्रभू चौधरी यांनी राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश प्रभारी यांच्या सहमतीने कार्यकारिणीची निवड केली. नूतन पदाधिकार्यांचे राष्ट्रीय शिक्षक संचेतना संस्थेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे. तर प्रा.डॉ.शेणकर यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

