अतिक्रमण काढल्याने राहाता पालिकेसमोर मुस्लीम बांधवांचा ठिय्या
अतिक्रमण काढल्याने राहाता पालिकेसमोर मुस्लीम बांधवांचा ठिय्या
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील पालिका इमारतीजवळ असलेल्या ईदगाह मैदानाला लागून असलेले पत्र्याचे अतिक्रमण पालिका प्रशासनाने काल पहाटेच्या वेळी काढले. त्यामुळे सकाळी सातच्या सुमारास मुस्लीम बांधवांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी अतिक्रमण काढणे बंद करुन पालिकेसमोर ठिय्या दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर मुख्याधिकार्यांच्या लेखी आश्वासनानंतर मुस्लीम बांधवांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

राहाता शहरातील पालिका इमारतीजवळ असलेल्या ईदगाह मैदानाला लागून असलेले पत्र्याचे अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढले. सदर गोष्ट मुस्लीम बांधवांना समजताच त्यांनी पालिकेसमोर ठिय्या दिला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस फौजफाटा कोपरगाव, शिर्डी, राहुरी व संगमनेर येथून मागविला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी अजित निकत, नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ.राजेंद्र पिपाडा, नगरसेवक सलीम शहा, मौलाना रऊफ इलिहास शहा, मुश्ताक शहा आदिंनी राहाता पोलीस ठाण्यात सर्व मुस्लीम बांधवांची बैठक घेतली. यावेळी मुस्लीम बांधवांनी पालिकेवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी तक्रार अर्ज घेत सदर जागेचा पंचनामा केला. दि. 3 ऑक्टोबरला भूमि अभिलेख कार्यालय सदर जागेच्या हद्द खुणा करेल. त्यानंतर या जागेवर अतिक्रमण आहे कि नाही हे सिद्ध झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल तोपर्यंत आहे ती परिस्थिती ठेवावी असे या बैठकीत ठरले. याबाबत मुख्याधिकारी निकत यांनी दिली आणि मुस्लीम बांधवांनी आंदोलन मागे घेतले.

