डॉ.सत्यपाल सिंह यांनी राजीनामा द्यावा!

डॉ.सत्यपाल सिंह यांनी राजीनामा द्यावा!
ख्रिस्ती विकास परिषदेची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संसद भवनमध्ये एफ. सी. आर. ए. दुरुस्ती विधेयकावर बोलताना खा. डॉ.सत्यपाल सिंह यांनी ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स यांच्यावर केलेल्या आरोपाचा महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील परिषदेच्यावतीने केली आहे.


डॉ.सत्यपाल सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. पी. वाधवा यांच्या अध्यक्षेखाली स्थापन केलेल्या समितीचा व न्यायालयीन चौकशी प्रक्रियेचा त्यांनी अपमान केला आहे. ग्रॅहम स्टेन्स यांची पत्नी व दोन मुलांना जिवंतपणे जाळण्यात आले ही घटना भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारी होती. आदिवासी भागात कुष्ठरोग्यांसाठी उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेऊन ग्रॅहम स्टेन्स यांच्या पत्नीला सन 2006 मध्ये ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. दरम्यान, डॉ.सिंह यांनी प्रशासनात चांगली सेवा केलेली आहे. परंतु ख्रिस्ती मिशनरी सेवेबरोबरच ज्या आज हयात नाहीत त्या व्यक्तीविषयी असंवेदशीलपणे भर संसदेत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन खोटे आरोप करण्याची पद्धत पाहिली तर ख्रिस्ती धर्म संपविण्याचा तर कट नाही ना? अशी शंका निर्माण होते. त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र विषेध व्यक्त करून, लोकसभा संसद सदस्यपदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

Visits: 144 Today: 1 Total: 1983427

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *