चांदेकसारे येथील दोन मंदिरातील दानपेट्या फोडल्या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद;$पोलिसांचा तपास सुरू

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बालभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात गुरुवारी (ता.23) रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात असलेल्या दोन दानपेट्या कटरच्या सहाय्याने फोडून मोठी रक्कम लांबवल आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी मंदिरात दर्शन करण्यासाठी आलेल्या भाविकांना हा घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मंदिरात दाखल झाले. आणि घटनेची माहिती पोलीस पाटील मीरा रोकडे यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना दिली.

हा चोरीचा प्रकार मंदिरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या मंदिरात दानपेट्या फोडण्याची ही दुसरी घटना असून हे चोरटे याच परिसरातील व माहितीतील असल्याचे सांगण्यात येते. कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केल्या असल्याचे समजते. मात्र या दानपेटीमध्ये नेमकी रक्कम किती होती याचा अंदाज आल्या नसल्याने नेमकी किती रक्कम चोरून नेली हे गुलदस्त्यात आहे. मंदिरामध्ये व देवाच्या गाभार्‍यात दोन दानपेट्या ठेवलेल्या आहेत. या भरीव व भक्कम दानपेट्या चोरट्यांनी इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने तोडून त्यामधील रक्कम लांबवली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Visits: 107 Today: 2 Total: 1107713

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *