संगमनेरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न शिववंदना व आरती करून सोहळ्याचा समारोप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विश्व हिंदू परिषद बजरंग दल, दुर्गावाहिनीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रविवारी (ता.12) शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेव्हणे सरदार कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज श्री संग्रामसिंग जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील महाराजांच्या मूर्तीचे 11 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत भारतातील पवित्र 11 नद्यांचे जलपूजन करून सकाळी 8:30 ते 10 वाजेदरम्यान 11 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने शिवराज्याभिषेक झाला. 10 वाजता शिववंदना व आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, त्यानंतर प्रसाद वाटप झाले. या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक अशोक सराफ, पतीत पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे गोपाळ राठी, प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, संदीप वारे, विशाल वाकचौरे, कुलदीप ठाकूर, शुभम कपिले, आशिष ओझा, गणेश भोईर, आकाश राठी, राजेंद्र महाजन, वाल्मिक धात्रक, रमेश शहरकर, आशुतोष भुजबळ, श्याम नाईकवाडी, जितू तिवारी, गणेश भोईर, अजिंक्य डोंगरे, रवी मंडलिक, दुर्गावाहिनीचे गुंजन कर्पे, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी व शिवभक्तांची मोठी गर्दी होती.