संतप्त ग्रामस्थांनी हॉटेलमधील अवैध दारुविक्री पाडली बंद धामणगाव पाट येथील हॉटेल मराठा दरबारमधील प्रकार
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील धामणगाव पाट येथील हॉटेल मराठा दरबारमध्ये सुरू असलेली अवैध दारुविक्री ग्रामस्थांनी बंद पाडली. अवैध दारुविक्रीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी पोलीस व राज्य उत्पादन विभागाला कळवूनही कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनीच मंगळवारी (ता.31) आंदोलनाचे हत्यार उपसले. सदर हॉटेल अकोले पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास गायकर यांच्या मालकीचे आहे.
मंगळवारी ग्रामसभा होती यावेळी हा विषय चर्चेला आला होता. ग्रामपंचयतची परवानगी न घेता भानुदास गायकर यांनी हॉटेल मराठा दरबार येथे अवैध दारु विकली जात होती. ती बंद करण्याचा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ग्रामस्थांनी हॉटेलवर जाऊन ही दारुविक्री बंद पाडली. याबाबत ग्रामस्थांनी अकोले पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी फौजफाट्यासह तत्काळ घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, हॉटेलपासून अगदी काही अंतरावर गावातील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. तसेच बाजूलाच बस थांबा आहे. जवळच लहान मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे. मात्र, या हॉटेलमुळे गावातील अनेक चांगले प्रपंच उध्वस्त होऊन तरुणाई व्यसनाधीन होत आहे. यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी हॉटेलवर धडक देत दारुविक्री बंद पाडली.
यामध्ये युवक राष्ट्रवादी कांग्रेसचे मुळा विभाग प्रमुख नीलेश घुले, राष्ट्रवादीचे धामणगाव पाट शाखाप्रमुख दीपक चौधरी, सरपंच दीपक पारधी, उपसरपंच बाळासाहेब भोर, ग्रामपंचायत सदस्य सचिन भोर, सोमनाथ पारधी, विमल शेळके, सुनीता हेंबाडे, माजी सरपंच अशोक शेळके, रोहिदास भोर, ज्ञानदेव भोर, ग्रामस्थ बबलू चौधरी, धोंडीभाऊ भोर, बाळासाहेब चौधरी, संदीप चौधरी, संतोष चौधरी, संजय भोर, बंडू भोर, वैभव चौधरी, सुभाष भोर, देवानंद रोकडे, विकास चौधरी, प्रमोद चौधरी, भाऊसाहेब चौधरी, दिलीप भोर, प्रभाकर चौधरी, गौराम चौधरी, रुपेश शेळके, विजय चौधरी, अविनाश लोखंडे, अमोल भोर, संजय शेळके, संजय भोर, संदीप शेळके, मयूर चौधरी, किरण चौधरी, कार्तिक राऊत, सोमनाथ वाकचौरे, सागर भोर, अमोल चौधरी, योगेश भोर, प्रमोद चौधरी, विशाल घुले आदी सहभागी होते. दरम्यान, हॉटेलवर कारवाई केली नाही तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तत्पूर्वी सदर दारु ग्रामस्थांनी पोलिसांकडे सुपूर्द केली.