ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपाचे लाक्षणिक उपोषण! महाविकास आघाडी सरकारच्या माथी फोडले खापर; वेळकाढूपणा भोवल्याचाही आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनःस्थापित व्हावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्यावतीने सोमवारी प्रशासकीय भवनाच्या बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्य सरकारच्या नियोजना अभावी ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

सर्वोच्च न्यायालयाने 13 डिसेंबर, 2019 रोजी राज्य सरकारला तिहेरी चाचणी (ट्रिपल टेस्ट) करुन ओबीसींचा इम्पेरिकल डेटा न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आयोगाची स्थापना करण्याच्या सूचनाही न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या होत्या. परंतु, राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यास उशीर केला आणि आयोगाला वेळेत निधी व मनुष्यबळ उपलब्ध करुन दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले. मात्र त्याचवेळी मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तिहेरी चाचणी करुन इम्पेरिकल डेटाही वेळेत सादर केला. परिणामी मध्य प्रदेशात ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण पुनःस्थापित झाले, मात्र राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणांमुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण मात्र रद्दच राहिले. राज्य सरकारने एकप्रकारे ओबीसी समाजावर हा अन्यायच केला असून आरक्षणाचे मारेकरी ठाकरे-पवार सरकार असल्याचा घणाघातही यावेळी विविध वक्त्यांनी बोलताना केला.

या आंदोलनात भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांच्यासह नंदकुमार जेजूरकर, डॉ.अशोक इथापे, अ‍ॅड.श्रीराम गणपुले, भारत गवळी, दीपक भगत, संपत गंलाडे, अ‍ॅड.गोरक्ष कापकर, वैभव लांडगे, जावेद जहागिरदार, शिरीष मुळे, सतीश कानवडे, भारत फटांगरे, भगवान गिते, संजय नाकील, कैलास भरीतकर, सीताराम मोहरीकर, सुनील खरे, कांचन ढोरे, मनोज जुंदरे, राहुल भोईर, दिलीप रावळ, दीपेश ताटकर, हरीश चकोर, बाबुराव खेमनर, शिवकुमार भंगिरे, भगवान कुक्कर, बालाजी लालपोतु, प्रशांत वाडेकर, स्वानंद रासने, जितेंद्र माळवदे, श्याम कोळपकर, संपत गेठे, नवनाथ वावरे, कोंडाजी कडनर, अशोक कानवडे, बुवाजी खेमनर, पप्पू तेजी, श्याम कासार, साहेबराव वलवे, अ‍ॅड.संदीप जगनर, संतोष भालसिंग, संतोष पठाडे, विकास गुळवे आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले होते.

Visits: 16 Today: 1 Total: 115290

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *