कुकाणा-वरखेड रस्त्यावरील पूल वाहून गेला

कुकाणा-वरखेड रस्त्यावरील पूल वाहून गेला
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकाणा-वरखेड रस्त्यावरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे रस्त्यावरील जड वाहतूक गेल्या सहा तासांपासून ठप्प झाली होती.


सध्या या रस्त्यावरील पुलाचे काम चालू आहे. पुलाचे काम चालू असल्याने रहदारीसाठी पर्यायी रस्ता काढून दिलेला होता. परंतु तो सुद्धा झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. वास्तविक पाहता संबंधित पुलाचे काम अगोदर होणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. यामुळे गेवराई, वाकडी, सुलतानपूर, शिरजगाव, वरखेड गावाकडे जाणारा मार्ग तब्बल सहा तास बंद होता. आजही पुलाचे काम सुरू न झाल्याने इतर गावांशी संपर्क तुटतो की काय? अशी भाती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Visits: 247 Today: 1 Total: 2121905

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *