साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव कालवश

साईसंस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव कालवश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. यादव यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी (ता.25) त्यांची तब्बेत ढासळल्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.


गेल्या सोळा वर्षांपासून यादव साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत होते. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के. व्ही. रमणी यांनी संस्थानला 110 कोटींच्या देणगीतून साईआश्रम इमारत बांधून दिली. त्यातील काही इमारतीत आज कोविड हॉस्पिटल सुरू आहेत. यादव यांचा देश-विदेशात मोठा जनसंपर्क होता. त्यांनी यातून संस्थानला विशेषतः रुग्णालयासह विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून दिल्या. यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा जवळपास बारा भाषांत अनुवाद झालेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 39 Today: 2 Total: 420247

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *