श्रीरामपूरच्या महावितरण कार्यालयात भाजपचे अर्धनग्न आंदोलन श्रीराम नवमी यात्रौत्सव काळात वीज पुरवठ्यात भेदभाव केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच भरलेल्या श्रीराम नवमी यात्रेच्या काळात हिंदूबहुल भागाचा महावितरणने वीज पुरवठा खंडित केला त्याचवेळी संदल सुरू असलेल्या परिसरात वीज पुरवठा केला. महावितरणकडून अशा भेदभावाच्या निषेधार्थ व श्रीराम नवमी यात्रेसाठी सुरळीत वीज पुरवठा करावा मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, विश्व हिंदू परिषदेचे डॉ. दिलीप शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या विभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता चावडा यांना तीन तासाचा घेराव घालून अर्धनग्न आंदोलन केले.

मुख्य कार्यकारी अभियंता भंगाळे यांच्याशी झालेल्या चर्चेत पुढील पाच दिवस श्रीराम नवमी यात्रा परिसरात संध्याकाळी 6 ते रात्री 1 या काळात वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे लेखी आश्वासन भंगाळे व चावला यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी काळे झेंडे घेऊन आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडले. वीज पुरवठा खंडित करून जातीय भेदभाव करणार्‍या महावितरणचा धिक्कार असो, जातीय भेदभाव करणार्‍या महावितरणचा निषेध असो, रामनवमी यात्रेला वीज पुरवठा न करणार्‍या महावितरणचा निषेध असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा देऊन महावितरणचे कार्यालय दणाणून सोडले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चावडा यांना घेराव घालून अडीच तास झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अभियंता भंगाळे यांच्याशी आंदोलकांचा दूरध्वनीवरुन संपर्क झाला. त्यावेळी चित्ते व डॉ. शिरसाठ यांनी भांगाळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संध्याकाळी 6 ते 1 या कालावधीत पाच दिवसांसाठी म्हणजे 17 तारखेपर्यंत श्रीराम नवमी यात्रा परिसराला वीज देण्याचे मान्य केले. तसेच पुढील काळासाठी पुन्हा प्रयत्न करू, असे सांगितले. त्यानंतर चावडा यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे, सोमनाथ कदम, सोमनाथ पतंगे, बबन जाधव, सिद्धार्थ साळवे, महेश विश्वकर्मा, अर्जुन कर्पे, अमोल बोधक, सागर मलीक, बाळासाहेब गाडेकर, रमेश सातपुते, संदीप साठे, मच्छिंद्र बहिरे, रितेश काटे, प्रसाद सातोरे, सुनील इंगळे, उमेश पवार, अजिंक्य गोर्डे, शुभम गोर्डे, पीयूष गोर्डे, आकाश गोर्डे, सचिन थोरात, रवी सातोरे, किरण सातोरे, ऋतीक कांबळे, तिलक सोनार, बंटी अडांगळे, दर्शन चव्हाण, विनायक गायकवाड, बंटी शिंदे, योगेश व्यवहारे, कुणाल सूर्यवंशी, अजय आहेर, विशाल बहिरे, सचिन शरणागत, विकी चव्हाण, रवींद्र चव्हाण, हरीश शिंदे, शुभम साळवे आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Visits: 4 Today: 1 Total: 30606

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *