महामानवाच्या शोभायात्रेत धर्मांध मुस्लिमांचा धुडगूस! हिरव्या झेंड्यांसह घोषणाबाजी; महिलांची छेडछाड; सव्वाशे जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुवारी संगमनेरात निघालेल्या शोभायात्रेला काही हुल्लडबाज तरुणांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. उत्साहात सुरु असलेली महामानवाची शोभायात्रा मेनरोडवर येताच काही धर्मांध मुस्लिम तरुणांनी चाँदतारा रेखाटलेले हिरवे व लाल झेंडे हाती घेवून या शोभायात्रेत शिरकाव केला. यावेळी या तरुणांनी ‘अल्ला हु अकबर, इस्लाम झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. याप्रकरणी पोलिसांनी सव्वाशे जणांवर कट रचून धार्मिक भावना भडकाविणे, दंगल घडविण्याचा प्रयत्न करणे, मारहाण व धक्काबुकी करणे, महिलांची छेडछाड करण्यासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना अटक केली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.14) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेरातील संघर्ष तरुण मंडळाने सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन केले होते. सदरची शोभायात्रा मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात आली असता अचानक आसपासच्या बोळातून शंभर ते सव्वाशे मुस्लिम तरुणांनी हातात हिरवे व लाल रंगाचे चाँदतारा रेखाटलेले झेंडे घेवून या शोभायात्रेत शिरकाव केला. सुरुवातीला या तरुणांना कोणीही विरोध केला नाही, त्यामुळे उन्माद चढलेल्या या तरुणांनी ‘अल्ला हु अकबर, इस्लाम झिंदाबाद’च्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी मेनरोडवरील तरुण मंडळाने स्वागत सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी मंचही उभारण्यात आला होता. त्याच ठिकाणी या हुल्लडबाज धर्मांधांनी धुडगूस घालीत तुफान घोषणाबाजी केली. यावेळी या टोळक्यातील काही तरुणांनी महामानवाची प्रतिमा ठेवलेल्या रथासमोर येवून विक्षीप्त हावभाव व नृत्य करीत रथ ओढण्यास सुरुवात केली, तर काहींनी शोभायात्रेतील महिलांना स्पर्श करीत त्यांना लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केले. सदरची शोभायात्रा दलित समाजाची असल्याची पूर्ण माहिती असतांनाही या हुल्लडबाजांनी त्यात अनाधिकाराने प्रवेश करुन दुसर्या धर्माच्या भावना दुखावल्या व प्रतिमेचा अवमान होईल असे कृत्य केले.
सदरचा प्रकार लक्षात येताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फौजफाट्यासह घटनास्थळ जवळ करीत या शोभायात्रेत घुसलेल्या मुस्लिम तरुणांना हुसकावून लावले व सदरची शोभायात्रा मार्गस्थ केली. या प्रकरणी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास किशोर चव्हाण (रा.दिल्लीनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा.मोमीनपूरा), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इक्बाल बागवान, सोहेल इक्बाल बागवान, अल्ला अजीज खान, हमजा शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान (गफ्फारचा मुलगा), मारुफ अस्लम बागवान या निष्पन्न आरोपींसह शंभर ते सव्वाशे जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (अ), 296, 153 (ब), 354 (अ), 143, 147, 120 (ब), 323 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रोसिटी) कलम 3 (1) (यु) (व्हि) (डब्ल्यु), 3 (2) (5, ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यातील मारुफ अस्लम बागवान (वय 20, रा.बागवानपूरा) व अब्दुल समद जावेद कुरेशी (वय 21, रा.भारतनगर) या दोघांना अटक केली आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शोभायात्रा उत्साहात सुरु असतांना रात्री आठच्या सुमारास मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडलेल्या या घटनेने परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत धुडगूस घालणार्या तरुणांना या शोभायात्रेतून हुसकावून लावल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजसह मोबाईलवर करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली असून आरोपींना जेरबंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे.