धर्मांतर करा महिन्याला दोन हजार देतो! परप्रांतीयाला राहुरीतील महिलेनं शिकवला धडा

नायक वृत्तसेवा, राहुरी
ब्राह्मणी (ता. राहुरी) येथे एका परराज्यातील व्यक्तीने पैशांचे आमिष दाखवून, धर्मांतर करण्याचा आग्रह केला. महादेवाची पिंड पाण्यात सोडून देण्यास सांगितले. पाण्यात उतरल्यावर खांद्यावर हात ठेवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अशा एका महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कमलसिंग (पूर्ण नाव माहिती नाही, मूळ रा. पंजाब, हल्ली मुक्काम ब्राह्मणी) असे आरोपीचे नाव आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, 3 एप्रिल, 2022 रोजी आरोपीने घरी येऊन, मला धर्मांतराचा आग्रह केला. घरातील महादेवाची पिंड पाण्यात सोडून द्या. आमच्या धर्माचे साहित्य पूजनासाठी घ्या. धर्मांतर केल्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये दिले जातील, असे सांगितले.

ब्राह्मणी येथील तीन नंबर चारीवर आरोपी मला घेऊन गेला. पाण्यात उतरायला सांगितले. त्यावेळी खांद्यावर हात ठेवला. धार्मिक भावना दुखावल्याने व लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केल्याने आरोपीला लोटून पळून गेले. गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला. कुणीतरी पोलिसांना फोन केला. त्यावेळी पोलीस तत्काळ गावात आले. परंतु, घाबरलेली असल्याने त्यावेळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला नाही, असेही महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.

Visits: 224 Today: 1 Total: 2122547

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *