कोळपकर बंधूंनी व्यवसायात मूल्यांची जोपासना केली ः थोरात गृह वस्तू भांडारच्या तिसर्‍या दालनाचे शानदार उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर येथील कोळपकर बंधूंनी सुरू केलेल्या व्यवसायात ग्राहकांची सेवा करण्याबरोबर अत्यंत विनम्रतेेने ग्राहकांशी संबंध ठेवल्याने अल्पावधीतच त्यांना यश मिळाले आहे. सद्यस्थितीत व्यवसाय करताना मूल्यांची जोपासना ही महत्त्वाची आहे. सध्या अनेक कंपन्या व्यवसायामध्ये उतरत असताना ग्रामीण भागात ग्राहकांशी नाळ जोडून उद्योग-व्यवसाय जोपासणे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत गृह वस्तू भांडारने आपला बॅ्रंड तयार केला आहे. त्यांनी आपली तिसरी शाखा सुरू करणे हे अत्यंत कौतुकास्पद इतर जिल्ह्यांतही दालन सुरू करावे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

शहरातील गृह वस्तू भांडारने आपली तिसरी कोल्हार-घोटी मार्गावरील सुकेवाडी गणपती मंदिराच्या पुढे सुरू केली आहे. नुकताच तिचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संपत कुटे, रामेश्वर कोळपकर, परेश कोळपकर, संतोष कोळपकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, गृह वस्तू भांडार ही संगमनेरसाठी अत्यंत विश्वासार्ह संस्था बनली आहे. त्यांनी स्वतःचा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळे त्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत नाही. कोळपकरांची संस्थाच ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. उद्योज राजेश मालपाणी म्हणाले, व्यवसाय कसा करावा व त्यात सातत्यपूर्ण वृद्धी कशी करावी हे कोळपकर उद्योग समूहाकडून शिकावे, असे त्यांनी मत व्यक्त केले.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, संगमनेरसारख्या शहरात महिलांना हव्या असलेल्या स्वयंपाकगृहातील सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांसाठी पर्वणी ठरणार आहे.
एकाच दालनात गृहोपयोगी वस्तूंचा खजिना उपलब्ध होत असल्याने असंख्य महिला आणि ग्राहकांची गृह वस्तू भांडारला पहिली पसंती मिळत आहे. यामुळे असंख्य ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी गृह वस्तू भांडारने मंगल कार्यालयांचे जाळे असलेल्या कोल्हार-घोटी मार्गावरील गणपती मंदिराच्या पुढे तिसरी शाखा सुरू केली आहे. दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नामांकित कंपन्यांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या नूतन शाखेला भेट द्या, असे आवाहन कोळपकर बंधूंनी केले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 79667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *