प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय आवारात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (ता.24) सुरू झालेले लेखणी बंद ठिय्या आंदोलन 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. याची दखल घेत आमदार डॉ.किरण लहामटे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांसह आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करु असे आश्वासन देत निवेदन स्वीकारले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, सुरेश गडाख, ईश्वर वाकचौरे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष रवी मालुंजकर, शहराध्यक्ष संतोष नाईकवाडी, शिक्षक संघटना अध्यक्ष अण्णासाहेब ढगे, खजिनदार चंद्रकांत नवले, विकास बंगाळ यांनी सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना व इतर प्रलंबित मागण्यांची सविस्तर माहिती घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अर्थमंत्री अजित पवार यांचेकडे शासन दरबारी पाठपुरावा करून स्वतः प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्यावतीने दिलेले निवेदन स्वीकारले. या आंदोलनात शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पुणे विभाग सचिव किशोर धुमाळ, सदस्य शिवदत्त बंगाळ, लहानू जेडगुले, मच्छिंद्र नाईकवाडी, शरद कडलग, कैलास भालेराव, बनेश सावंत, अनिता सहाणे, पुष्पावती भुजबळ, मीरा पराड, दीपक जाधव, वरीष्ठ लिपीक राजू सय्यद, के. एल. साबळे, बाळू मेंगाळ, अमोल वाकचौरे, परेश पाटेकर, सखाराम पथवे सहभागी झाले आहेत. तर कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक बी. एच. पळसकर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणपत नवले, तान्हाजी जाधव, गुलाब देशमुख, विकास निमसे, भाऊसाहेब नाईकवाडी आदिंनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 30524

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *