स्व.धात्रक यांच्या दशक्रियाविधीनिमित्त वृक्षारोपण
स्व.धात्रक यांच्या दशक्रियाविधीनिमित्त वृक्षारोपण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वडील स्व.सीताराम धात्रक यांच्या दशक्रियाविधीनिमित्त त्यांच्या स्मृती चिरंतन स्मरणात राहण्यासाठी दशक्रिया घाटावर नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये रुद्राक्ष, नागकेशर, भीमसेनी कापूर यांसारख्या दुर्मिळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून दशक्रिया विधी पार पाडला. याप्रसंगी सर्वच क्षेत्रांतील मान्यवर आणि नातेवाईक उपस्थित होते. धात्रक परिवाराच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Visits: 100 Today: 1 Total: 1108261
