घरगुती कारणावरुन साकूरमध्ये दोन गटांत तुफान धूमश्चक्री! परस्पर विरोधी तक्रारी; दोन्ही बाजूच्या अठ्ठावीस जणांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, घारगाव
पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरीत राज्यात शुक्रवारी धूलिवंदनाचा उत्सव साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील पठारभागात मात्र मागील भांडणाच्या कारणावरुन दोन गट एकमेकांवर चालून गेले. या धूमश्चक्रीत एकाबाजूने लाठ्या, काठ्या व लाकडी दांड्यांचा मुक्त वापर झाल्याने दुसर्‍या बाजूचे अर्धा डझन लोक जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्परविरोधीत तक्रारी दाखल करण्यात आल्या असून मारहाणीसह रोकड व मंगळसूत्र चोरीला गेल्याचेही तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन घारगाव पोलिसांनी दोन्हीकडील 28 जणांवर दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.18) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यातील पहिली घटना घडली. साकूरच्या हिरेवाडीत राहणार्‍या किसन कारभारी खेमनर यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीनुसार दुसर्‍या गटातील सोळा जणांनी मागील भांडणाचा राग काढीत फिर्यादीच्या घरी येवून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी दत्तू खेमनर, दीपक खेमनर व सुनील खेमनर यांनी फिर्यादीच्या घरात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. तसेच, गंगाराम खेमनर व जिजाबाई खेमनर यांनी फिर्यादीची पत्नी व सूनेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र तोडून घेत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानुसार घारगाव पोलिसांनी आरोपी दत्तू एकनाथ खेमनर, दीपक दत्तू खेमनर, रावसाहेब एकनाथ खेमनर, पोपट एकनाथ खेमनर, सुनील मारुती खेमनर, बाळू मारुती खेमनर, मारुती तुकाराम खेमनर, परवीन बाळू खेमनर, दाद्या सुनील खेमनर, गणेश त्रिंबक खेमनर, नवनाथ पोपट खेमनर, प्रवीण बाळासाहेब खेमनर, ज्ञानेश्वर शंकर खेमनर, गंगाराम शंकर खेमनर, जिजाबाई पोपट खेमनर व मीराबाई सुनील खेमनर अशा सोळा जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 143, 147, 452, 327, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यातील दुसरी घटना त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत गुरुवारी (ता.17) झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी बाराजणांनी पोपट एकनाथ खेमनर यांच्या घरावर धावा केला. यावेळी आरोपींनी काठ्या व लाकडी दांड्यांचा वापर करीत फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीच्या खिशात असलेली एक लाख रुपयांची रोख रक्कमही काढून घेण्यात आली. सदरची भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही या गदारोळात लंपास करण्यात आले. यावेळी या बाराजणांनी घरातील सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व जीवे मारण्याचीही धमकी दिली.

या प्रकरणी पोपट एकनाथ खेमनर यांच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी आरोपी अशोक किसन खेमनर, किसन कारभारी खेमनर, भास्कर कारभारी खेमनर, तुकाराम भाऊसाहेब खेमनर, संतोष किसन खेमनर, राधाबाई किसन खेमनर, सखुबाई किसन खेमनर, ताईबाई भास्कर खेमनर, संतोष धोंडीबा खेमनर, विमल संतोष खेमनर, दत्ता संतोष खेमनर (सर्व रा.साकूर) व गणेश पांडुरंग डोमाळे (रा.मांडवे बु.) अशा बारा जणांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 143, 147, 148, 149, 324, 327, 452, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणांचे तपास पो.हे.कॉ. डी. एस. वा हीींिं://ी.शस.वा/याळ यांच्याकडे देण्यात आले असून या दोन्ही घटनांतील कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ऐन धूलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची संपूर्ण पठारभागात चर्चा रंगली आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 115383

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *