शिवाजी कर्डिले शिवसेनेत आल्यास स्वागतच करू! शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंचे आवाहन


नायक वृत्तसेवा, राहुरी
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची सत्तेवर निष्ठा तर आमची पक्षावर निष्ठा आहे. कर्डिले यांना सत्तेशिवाय झोप येत नाही. त्यांना शिवसेनेने मंत्री केले होते. पुन्हा सत्ता लागत असेल तर त्यांनी खुशाल शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील सोसायटीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सतत सत्तेशिवाय झोप येत नाही. सत्ता नसेल तर ते बेचैन होतात. त्यांना पुन्हा सत्ता लागत असेल तर आमच्या पक्षात आले तर निश्चितच सत्ता दिली जाईल. आम्ही आजपर्यंत पक्षावर निष्ठा ठेवलेली आहे. कधीही पक्ष बदलणारे आम्ही नाही, असे खेवरे म्हणाले. सोसायटीच्या नूतन संचालकांनी संस्थेचा कारभार चांगल्या पद्धतीने करून सभासदांची कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही, याची काळजी घेऊन कारभार करावा, असे ते म्हणाले.

यावेळी तालुका उपप्रमुख सचिन म्हसे, पोपट शिरसाठ, विजय शिरसाठ, शहाजी वराळे, विजयी उमेदवार राजेंद्र गागरे, सावळेराम गागरे, सोपान गागरे, दिनेश घोरपडे, बाबासाहेब लोंढे, जानमोहम्मद सय्यद, मधुकर सिनारे, अण्णासाहेब हारदे, नारायण संसारे, ज्ञानदेव, गागरे, बाळासाहेब गागरे, मंगल लोंढे, अलका गागरे, चंद्रभान गागरे, सीताराम गागरे, भाऊ गागरे, लक्ष्मण गागरे, बाबासाहेब गागरे, बाबुराव हारदे, भागवत मुसमाडे, दिनकर लोंढे, विशाल लोंढे, कैलास पोदे आदी उपस्थित होते.

Visits: 204 Today: 1 Total: 2164930

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *