निरोगी महिला हा कुटुंबाचा खरा अलंकार ः डॉ. वालझाडे संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने महिला दिन साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरमधील पुरोहित प्रतिष्ठान (संगमनेर पुरोहित संघ) यांनी महिला दिनाचे औचित्य साधून कासट मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर व्याख्यान देताना डॉ. वालझाडे यांनी स्त्री म्हणजे खरोखर परिवाराचा आधारस्तंभ असते. तिच्या आरोग्यावरच परिवाराची प्रगती अवलंबून असते. त्यामुळे निरोगी, सुदृढ महिला हा संपूर्ण कुटुंबाचा खरा अलंकार असते. प्रत्येक स्त्रीने हा अलंकार जीवापाड जपला पाहिजे, जोपासला पाहिजे, असे मत माधवबाग क्लिनिकच्या संचालिका डॉ. कल्पिता वालझाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रा. डॉ. ज्योती कुलकर्णी व स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका संज्योत वैद्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‘योग्य आहार आणि सुयोग्य व्यायाम यामुळे प्रत्येक महिला तंदुरुस्त राहून जीवनाचा आनंद घेऊ शकते तसेच परिवाराला पुढे घेऊन जाण्यात समर्थ भूमिका निभावू शकते. मधुमेहासारख्या आजारांना पळवून लावू शकते. ज्या ज्या कुटुंबातील महिला स्वतःच्या व परिवाराच्या प्रकृतीविषयी जागरूक असतात त्या परिवाराचा नक्कीच उत्कर्ष होतो’, असे डॉ. वालझाडे म्हणाल्या. डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात पुरोहित प्रतिष्ठानच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. संज्योत वैद्य यांनी ‘पुरोहित संघ माता भगिनींमध्ये देव बघतो. संघाचे कार्य स्तुत्य आहे. महिलांनी स्वत्व विकसित करून जीवनातील प्रत्येक क्षणाचा प्रसन्नतेने सण करणं शिकलं पाहिजे’ असे मत मांडले. या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. काही कर्तबगार महिलांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी निर्मला वाघोलीकर, लीला जोशी, आरती सोमाणी, कावेरी मुळे, वर्षा गोरे, संगीता आहेर, दीप्ती गुंजाळ, अमृता साठे, सुनीता पडवळ, संध्या वराडे, शाह मॅडम, मानसी पवार, चावरे मॅडम, रोहिणी नेवासकर, कल्पना गोरे, नीला जोशी, डॉ. स्वाती सोमण, स्वाती बनकर, लक्ष्मीबाई आव्हाड, प्रज्ञा म्हाळस, स्वप्ना संत, दीपाली उपासनी, देवयानी संभूस, प्रीती आडेप, प्रज्ञा निसाल, कल्पना कोडूर, नूतन निचल, मंगल पेटकर, प्रीती कानकाटे, शांताराम जोशी आदी उपस्थित होते. पुरोहित संघचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सतीश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच विशाल जाखडी यांनी आभार प्रदर्शन केले.
