‘रक्तदान हेच खरे जीवनदान’ ः मालपाणी संगमनेर महाविद्यालयात स्व.ओंकारानाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रक्तदान हे पवित्र कार्य आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण रक्तदान करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तुमचा रक्ताचा एक थेब हा इतरांना जीवनदान देऊ शकतो म्हणून रक्तदान हेच खरे जीवनदान आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी केले.

संगमनेर वरीष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना, विधी महाविद्यालय, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ओंकारानाथ मालपाणी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य व लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे माजी अध्यक्ष सुभाष मणियार, प्रोजेक्ट चेअरमन महेश डंग, अर्पण ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. अतुल जैन, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या अध्यक्षा मीना मणियार, अर्पण ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा पाठक, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, देविदास गोरे, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या सेक्रेटरी पूजा कासट, स्वाती मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना गिरीश मालपाणी म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असे दान आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा नेहमी धावपळ करत असतो, त्याच्या नित्याच्या धावपळीमुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे त्यास लवकर जाणवत नाही. शरीराची काळजी न घेतल्याने त्यास नकळत अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी आपल्याच काही नातेवाईकांना अथवा इतर आपल्या मित्रजणांना रक्ताची नितांत गरज भासते, तेव्हाच आपणास रक्ताच्या एका थेंबाची किंमत कळते. ही गरज लक्षात घेऊन आपण रक्तदान केल्यास आपण निश्चितच अनेक व्यक्तींचे प्राण वाचवू शकाल व त्यापासून आपणास आत्मिक समाधानही मिळेल. हे मिळालेले समाधान आपल्या आरोग्यास निश्चित लाभदायी ठरेल असेही ते म्हणाले.

या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील एन. एस. एस., एन. सी. सी. विद्यार्थी, ओंकारनाथ विधी महाविद्यालय आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण 95 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. आभार प्रा. हेमलता तारे यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. मारुती कुसमुडे, प्रा. सचिन पठारे, प्रा. खेमनर, राष्ट्रीय छात्र सेनेचे सीटीओ डॉ. नरेंद्र फटांगरे, लेफ्टनंट प्रा. हेमलता तारे, अर्पण ब्लड बँकेच्या जनसंपर्क अधिकारी प्रमिला कडलग, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Visits: 14 Today: 1 Total: 117721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *