श्रीरामपूर परिवहन कार्यालयात मान्यवरांच्या प्रतिमा अडगळीत
श्रीरामपूर परिवहन कार्यालयात मान्यवरांच्या प्रतिमा अडगळीत
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मान्यवरांच्या प्रतिमा केवळ देखावा म्हणून कार्यालयामध्ये लावल्या जात नाहीत. तर त्यामागे कारणेही असतात. परंतु या गोष्टींना हरताळ फासल्याचा प्रकार श्रीरामपूरच्या राज्य परिवहन कार्यालयामध्ये समोर आला आहे.
श्रीरामपूर येथील प्रकाश चित्ते यांना या कार्यालयाच्या अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिमा टाकलेल्या आढळल्या. याबाबत त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी खान यांना चांगलाच जाब विचारला. त्यानंतर खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तात्काळ तोंडी माफी मागून लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाईचे लेखी पत्र दिले. दरम्यान, एका कार्यकर्त्याच्या कामाकरिता भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हे परिवहन कार्यालयात गेले होते. तेथे त्यांना दुसर्या मजल्यावरील अडगळीच्या खोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रतिमा टाकलेल्या आढळल्या. त्यांनी सदर घटना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांच्या निदर्शनास आणून दिली. खान यांनी तात्काळ तोंडी माफी मागितली. तेव्हा चित्ते यांनी मला लेखी द्या, अशी मागणी केली. यावर खान यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले.