संगमनेर शहरासह तालुक्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट आग बचाव व आपत्ती व्यवस्थापनाचेही डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात आग लागून अनेक निष्पाप रुग्णांचा बळी गेला. यामुळे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालये खडबडून जागे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यात नुकतेच संगमनेर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन आणि आएमए शाखेकडून फाईट सेफ्टी सोल्युशन्स कंपनीकडून फायर ऑडिट करण्यात आले. तसेच आग बचाव प्रशिक्षण (फायर मॉक ड्रिल) व आपत्ती व्यवस्थापन (डिझॅस्टर मॅनेजमेंट) प्रशिक्षण शिबिरही राबविण्यात आले.

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयील अतिदक्षता कक्षास आग लागून अनेक निष्पाप रुग्णांचा बळी गेला होता. या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरूच असून, ठोस कारणे पुढे आलेली नाहीत. या जळीतकांडाची गांभीर्याने दखल घेत संगमनेर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन आणि आयएमए संगमनेर शाखेच्यावतीने पुणे येथील फायर फाईट सेफ्टी सोल्युशन्सकडून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. याचबरोबर सर्व डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना आग बचाव प्रशिक्षण (फायर मॉक ड्रिल) व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण (डिझॅस्टर मॅनेजमेंट प्रशिक्षण) देण्यात आले.

सदर प्रशिक्षण आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील सर्व सोयी-सुविधांयुक्त सोनांबेकर हॉस्पिटल येथे राबविण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, डॉ. शेवाळे, डॉ. घुले, डॉ. सावंत व इतर डॉक्टरांच्या पुढाकाराने राबविण्यात आले. या प्रशिक्षणाविषयी माहिती देताना अहमदनगर जिल्ह्याचे क्षेत्रीय अधिकारी कुणाल कोळपकर म्हणाजे, असोशिएशन पातळीवरील जिल्ह्यातील हे पहिलेच प्रशिक्षण शिबीर आहे. कंपनीचे संचालक गौरव वैद्य यांच्या सूचनांनुसार फक्त अग्निशमन यंत्रणा बसविणे पुरेसे नसून ती चालविण्याचे प्रशिक्षण असणे खूप गरजेचे आहे. तसेच अशी यंत्रणा फक्त वैद्यकीय क्षेत्रापुरती नसून सर्वच आस्थापनांसाठी गरजेची आहे. या प्रशिक्षणात आग लागण्याची करणे व त्यावरील उपाययोजना याची माहिती तज्ज्ञ रवींद्र डांगरे आणि गौरव वैद्य यांनी दिली.

Visits: 96 Today: 2 Total: 1114288

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *