विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातील ‘पुढार्यां’चा हस्तक्षेप थांबवा!
विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातील ‘पुढार्यां’चा हस्तक्षेप थांबवा!
बजरंग दलाची राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी येथील विवाहिता जया उर्फ चित्रा राहुल ताजणे आत्महत्या प्रकरणी येथील राजकीय मंडळी हस्तक्षेप करत आहेत. त्यांचा हस्तक्षेप थांबवून दोषींना कठोर शिक्षा होणेकामी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी बजरंग दलाने (संगमनेर) माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनात बजरंग दलाने म्हंटले आहे की, बजरंग दलाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख रवींद्र बाळू मंडलिक (रा.ढोलेवाडी) यांची बहीण जया उर्फ चित्रा हिचे आश्वी येथील राहुल नामदेव ताजणे याच्याशी सन 2011 मध्ये विवाह झाला. परंतु विवाहानंतर सासरच्या मंडळींनी मानसिक त्रासाबरोबर शारीरिक त्रास दिला. या दरम्यान, अनेकदा वादावर तोडगा काढून सांत्वन करत सासरी नांदण्यास पाठविले. तरीही सासरच्यांनी काही त्रास देण्याचे थांबविले नाही. नुकतीच विवाहिता जया हिने आत्महत्या केली असल्याचे पती राहुल नामदेव ताजणे, सासरा नामदेव ताजणे आणि सासू सुमन नामदेव ताजणे यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत गावातील राजकीय मंडळी हस्तक्षेप करत आहेत. हा हस्तक्षेप थांबवून दोषींना कठोर शिक्षा होणेकामी प्रयत्न करावा, अशी मागणी बजरंग दलातर्फे उत्तर नगर जिल्हा संयोजक सचिन कानकाटे यांनी केली आहे.