अजय फटांगरेंनी गटात सर्वात जास्त कामे केली ः थोरात पठारभागातील अकलापूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, घारगाव
जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात गटात विविध विकासकामे केली आहेत. एका गटाला एवढा मोठा निधी आला असे फारच कमी गट आहेत. याचबरोबर यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातूनही अनेक योजना गावोगावी राबवत आहे. त्याचा अनेकांना लाभ होत असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण शनिवारी (ता.29) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, साईसंस्थानचे विश्वस्त अॅड. सुहास आहेर, जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, संतोष शेळके, डॉक्टर महादेव वाणी, अरुण वाघ, संपत आभाळे, सुभाष आहेर, रमेश गुंजाळ, दिनेश पावडे, विकास शेळके, संदीप आभाळे, सुहास वाळुंज, गौरव डोंगरे, बाळासाहेब कुर्हाडे, शिवप्रसाद गोळवा, गणेश आभाळे, देविदास शेळके, हिरालाल आभाळे, संतोष देवकर, बाळासाहेब कुरकुटे, जयराम ढेरंगे, अकील शेख, रघुनाथ आभाळे, रमेश आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले, अकलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. स्वयंभू दत्त महाराज देवस्थान विकासासाठी 65 लाख रुपयांचा निधी दिला आहे. याचबरोबर विविध वाड्या-वस्त्यांच्या समस्याही मार्गी लावल्या आहेत. तसेच यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून वीजेचे प्रश्नही निकाली काढले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सगळ्यात जास्त कामे आपल्या गटात झाली असल्याचे शेवटी नमूद केले. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले, संगमनेर तालुका पर्जन्य छायेमध्ये येणारा तालुका आहे. मात्र तरीही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून हा तालुका सुजलाम सफालम केला आहे. अजयने युवक काँग्रेस व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम केले. एक लढणारा माणूस तुम्हाला मिळाला असल्याचे सांगितले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिवाजी तळेकर यांनी करुन शेवटी आभार मानले.
