जवळे कडलग शाळेला तीन संगणकांसह दोन लॅपटॉप भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई येथील होरिजन रिसर्च फाऊंडेशन आणि ठाण्याचे अविष्यत ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्यातून जवळे कडलग (ता.संगमनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तीन संगणक व दोन लॅपटॉप भेट देण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलगची शाळा वैविध्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. याच शाळेतील संगणक प्रयोगशाळा अधिक कार्यशील करण्यासाठी होरिजन रिसर्च फाऊंडेशन आणि अविष्यत ट्रस्टच्यावतीने तीन संगणक व दोन लॅपटॉप शिक्षक श्री. फटांगरे यांच्याकडे सुपूर्द केले. यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाद्वारे शिकण्यास मदत होणार आहे. याकामी हेमंत पोतदार यांनी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले. याप्रसंगी अविष्यत ट्रस्टचे डॉ. मिलिंद बागुल, किरण चौधरी, दीपाली जाधव, अजय भांगे, अमित चौधरी, डॉ. मेघना शहा, स्मिता बागुल, सरपंच सतीश पथवे, उपसरपंच नीलेश कडलग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदेश देशमुख, विठ्ठल कडलग, योगेश नाईकवाडी, प्रताप कडलग, वैभव लांडगे, गोकुळ लांडगे आदी उपस्थित होते. शेवटी उपसरपंच नीलेश कडलग यांनी आभार मानले.
