श्रीरामपूरमध्ये विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन तपासणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी प्रशासन करत आहे. तरी देखील बेजबाबदार नागरिक मोकाटपणे फिरत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, श्रीरामपूर शहरात मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी करुन पॉझिटिव्ह आढळल्यास थेट कोविड सेंटरला रवानगी केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात रोज नव्याने बाधित आढळत आहे. प्रशासन दिवस-रात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरी देखील बेजबाबदार नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, मोकाट फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन तपासणी केली जाते. श्रीरामपूर शहरातही पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, इतर अधिकारी, कर्मचारी, नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाकाबंदी करुन मोकाट फिरणार्‍यांची तपासणी करण्यासह नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शनिवारी 85 व्यक्तींच्या केलेल्या तपासणीत दोघे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांची रवानगी थेट कोविड सेंटरला केली आहे. या कारवाईचा अनेकांनी धसका घेतल्याने दुपारपर्यंत शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याची दिसून आली.

Visits: 7 Today: 1 Total: 116043

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *