वनकुटे व कोठे बुद्रूकमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान
वनकुटे व कोठे बुद्रूकमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वनकुटे व कोठे बुद्रूक या दोन्ही गावांत नुकताच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे आदिंच्या हस्ते करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सुरू केलेले ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान संगमनेर तालुक्यात सर्वप्रथम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुरू केले. याबाबत पदाधिकारी व प्रशासनाच्या बैठका घेत हे अभियान शहरासह ग्रामीण भागातील सर्व वाडी-वस्त्यांपर्यंत राबविण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या होत्या. त्यानुसार पठारभागातील वनकुटे व कोठे बुद्रूक या गावातून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अभियानाची माहिती नागरिकांना देत अभियानाचे महत्त्वही पटवून सांगितले. त्यानंतर अधिकारी व पदाधिकार्यांनी गावात जाऊन नागरिकांचे तापमान मोजून अभियानाची सुरुवात केली. यावेळी बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.अतीष कापसे, घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.ढेरंगे, आरोग्य कर्मचारी खडके, डॉ.अभिषेक हांडे, सुहास वाळुंज, बाळासाहेब कुर्हाडे, बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, वनकुटेचे सरपंच, उपसरपंच, आशासेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

