विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुल्कवाढ व सक्ती करु नये!
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुल्कवाढ व सक्ती करु नये!
कोपरगाव शिवसेना व युवासेनेची मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुन अमोल कीर्तीकर, सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने आणि सुनील तिवारी व सनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवासेनेच्यावतीने शुक्रवारी (ता.18) कोपरगाव शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात वाढ व सक्ती करु नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील एस. एस. जी. एम. महाविद्यालय, नामदेवराव परजणे पा. महिला महाविद्यालय, के. बी. रोहमारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतेवेळी प्रवेश शुल्क भरण्याची सक्ती करू नये किंवा यावर्षी शुल्कामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवसाय, शेती व नोकरदार प्रभावित झाले आहेत. घरखर्चही झेपेनासा झाला आहे. अशा काळात विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नाही. त्यामुळे प्रवेशासाठी अडवणूक करु नये असे निवेदनात म्हंटले आहे. सदर निवेदन देतेवेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे रवींद्र कथले, शिवसेना उपशहरप्रमुख बालाजी गोरडे, संतोष जाधव, कुणाल लोणारी, सागर जाधव, अमोल शेलार, अनिल आव्हाड, आदिनाथ ढाकणे, शिवसेना संघटक वसीम चोपदार, अमित बांगर, सागर फडे, सनी काळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, शहरप्रमुख नितीष बोरुडे, सिद्धार्थ शेळके, उपशहरप्रमुख ऋषी धुमाळ, शिवम नागरे, मयूर फुकटे, प्रीतेष जाधव, उपतालुकाप्रमुख विजय भोकरे, प्रशांत बोरावके, अक्षय गुंजाळ, विजय गोरडे, गणेश घुगे, अभिषेक सारंगधर, विशाल औटी, शिवसेना शाखाप्रमुख डी.के.पाटील उपस्थित होते.