आखेगावामध्ये घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू

आखेगावामध्ये घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील आखेगाव येथे घराचे छत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार ता.19) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


या घटनेत नानाभाऊ शंकर कोल्हे (वय 79) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घर कोसळल्याचा आवाज होताच जवळपास राहणार्‍या लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलीस पाटलांनी सदर घटनेची खबर शेवगाव पोलिसांना देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गावातील मंडळींनी खोरे, फावडे साहाय्याने ढिगार्‍याखाली अडकलेल्या नानाभाऊंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत केले. मात्र लाकडी खांड, माती जास्त असल्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ढिगारा हटवावा लागला. नानाभाऊ कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सून सीताबाई या शेळ्या बांधण्यासाठी बाहेर गेल्याने त्या दोघी थोडक्यात बचावल्या आहेत. दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने खणाच्या घराचे माळवद कोसळल्याचे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 214 Today: 1 Total: 1986721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *