पद्मावती हिरोमध्ये ‘ट्रिपल झिरो’ महोत्सव सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दहा कोटीपेक्षा जास्त गाड्यांची विक्री करणारी आणि सलग 20 वर्षे जगातील क्रमांक एकची दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले अधिकृत विक्रेते पद्ममावती हिरो यांच्यातर्फे यंदाची वर्षाखेर ‘डिसेंबर हिरो लोन महोत्सव’ ऑफर 17 ते 31 डिसेंबरपर्यंत सुरू आहे. यात ‘शून्य टक्के व्याजदर शून्य डाऊन पेमेंट, शून्य टक्के प्रोसेसिंग फी’ असा ‘ट्रिपल झिरो’ महोत्सव सुरू आहे.

दरम्यान, यापूर्वी पद्मावती हिरोने ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आता वर्षातील शेवटच्या महिन्यात ‘हिरो लोन महोत्सव’ योजना सुरू आहे. यात डिसेंबरमध्ये दुचाकी किंवा स्कूटर खरेदी करणार्‍या ग्राहकांना गरजेनुसार कर्ज सुविधा देण्यात येणार आहे. शून्य टक्के व्याजदर शून्य डाऊन पेमेंट, शून्य टक्के प्रोसेसिंग फी, नो हायपो स्कीम (बँक बोजाशिवाय कर्ज), फक्त आधारकार्डवर कर्ज, शेतकर्‍यांसाठी ‘किसान खास लोन’ योजनेत पहिले दोन हप्ते एक हजार रुपयांचा तिसरा हप्ता 6800 रुपयांचा चेकबुकशिवाय कर्ज पुरवठा आणि रोखीने हप्ता भरण्याची सोय आहे. ‘ट्रिपल झिरो’ योजनेत हिरो फिनकॉर्पतर्फे झिरो प्रोसेसिंग फी, झिरो अ‍ॅडव्हान्स ईएमआय, झिरो डॉक्युमेंट चार्जेसने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. ‘सिबिल स्कोर’ 720 वर असणार्‍या ग्राहकांना 6.99 टक्के व्याजदरात गाडी मिळणार आहे. डिसेंबरमध्ये पद्मावती हिरोमधून दुचाकी किंवा स्कूटर खरेदी करणार्‍या ग्राहकांना एक हजार रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सेसरीस फ्री देण्यात येणार असून, एका ग्राहकास गाडी खरेदीवर एक गाडी जिंकण्याची (लकी ड्रॉ अंतर्गत) सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे पद्मावती हिरोमध्ये दुचाकी व स्कूटर सर्व रंगांमध्ये हजर स्टॉकमध्ये आहेत. याचबरोबर हिरो फिनकॉर्प, एचडीएफसी बँक, श्रीराम सिटी फायनान्स, इंडसइंड बँक, एल अँड टी, टाटा कॅपिटल, चोलामंडलम, आयसीआयसीआय बँक यांच्यातर्फे 90 टक्क्यांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी खरेदी करता येणार असल्याची माहिती पद्मावतीचे संचालक सुमित मणियार यांनी दिली असून, त्यासाठी आजच संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयाजवळ असणार्‍या पद्मावती हिरोच्या दालनास भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या, असे आवाहन केले आहे.

Visits: 18 Today: 2 Total: 115096

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *