संगमनेर शहर भाजपकडून सेवा सप्ताह निमित्ताने स्वच्छता अभियान

संगमनेर शहर भाजपकडून सेवा सप्ताह निमित्ताने स्वच्छता अभियान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्ताने संगमनेर शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कुठल्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्स, अनावश्यक खर्च टाळून गोरगरीब, अंध-अपंग, रुग्णांना मदत व गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.


यावेळी संगमनेर बस स्थानक परिसरात व गंगामाई घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात परिसरातील दुकानदार व नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वच्छता अभियान पूर्ण होताच निसर्गानेही यात हातभार लावला आणि पर्जन्यधारांनी सर्व परिसर स्वच्छ धुवून निघाला. ‘अमावास्येच्या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता करतो. आज सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी गावाची स्वच्छता केली, अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. यामध्ये ज्येष्ठ नेते राम जाजू, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी, शिवकुमार भंगीरे, गोरक्ष कापकर, श्रीकांत कासट, गौरव मालपाणी, शिवाजी लष्करे, अरुण कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, संजय जंगम, प्रभाकर खरात, दिलीप रावळ, भारत गवळी, जगू शिंदे, कल्पेश पोगुल, ज्योती भोर, कांचन ढोरे, रेश्मा खांडरे, असीफ पठाण, महेश जंगम, भगवान कुक्कर, तबरेज मोमीन, सोमा परदेशी, नासिरखान पठाण, विकास शिंदे, संतोष नवले, सुनील मानवतकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते कोविड-19च्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेत सहभागी झाले होते.

Visits: 164 Today: 1 Total: 2123031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *