करजगावमध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान
करजगावमध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान
नायक वृत्तसेवा, नेवासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्ताने भाजपच्यावतीने आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत नेवासा तालुक्यातील करजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय प्रांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चा नेवाशाच्यावतीने करजगाव येथे झालेल्या स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमाप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय करजगाव मैदानाची स्वच्छता; तसेच याच प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. संपूर्ण देशामध्ये 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम राबविला. यामध्ये सरपंच अशोक टेमक, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, तालुका सरचिटणीस महेश पवार, विनायक पुंड, परसराम माकोणे, ज्ञानेश्वर माकोणे, संतोष जगताप, माऊली बोरुडे, माऊली माकोणे, अशोक बर्डे, अशोक चव्हाण उपस्थित होते.

