महाराष्ट्रात अठ्ठावीस ओमिक्रॉन संशयित रुग्ण! दहा एकट्या मुंबईतील; राज्याची डोकेदुखी वाढली

मुंबई, वृत्तसंस्था
देशात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यात महाराष्ट्रात एकूण 28 ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्यानं ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील 10 संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूच्या प्रकाराने जगामध्ये दहशत माजवली आहे. भारतात गुरुवारी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आणि या विषाणूने अखेर देशात शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणा, सरकार सतर्क झाले असून, उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकात हे दोन रुग्ण सापडल्याने राज्याची डोकेदुखी वाढली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेकडो जण परदेशातून आले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 28 संशयित सापडले आहेत. त्यातील 10 जण हे मुंबईतील आहेत. तर इतर उर्वरित शहरांतील आहेत. या 28 जणांपैकी 25 जण हे विदेशातून आलेले आहेत. तर इतर 3 जण हे त्यांच्या संपर्कातील असल्याची माहिती समजते.

राज्यात ओमिक्रॉनचे 29 संशयित रुग्ण सापडले असून, त्यातील 10 जण हे मुंबईतील आहेत. या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचण्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे. मुंबईत अद्याप एकही ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्या संशयितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल लवकरच येतील अशी शक्यताही व्यक्त केली. हे सर्वजण गेल्या महिनाभराच्या कालावधीत विदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यातील 25 जण हे विदेशातून महाराष्ट्रातील विविध भागांत परतले असून, उर्वरित तीनजण हे या लोकांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. या सर्व रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

Visits: 29 Today: 1 Total: 118455

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *